Pimpri : जरांगे पाटील यांची पदयात्रा 24 जानेवारीला पिंपरी चिंचवड शहरात

एमपीसी न्यूज – मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण (Pimpri) आंदोलनाचा शेवटचा व निर्णायक टप्पा जाहीर केला आहे. मुंबई शहरात होणाऱ्या उपोषणाला जरांगे पाटील व लाखो मराठा बांधव जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारी रोजी मुंबईकडे यायला निघणार आहेत. ही पदयात्रा 24 जानेवारी (बुधवार) रोजी पिंपरी चिंचवड शहरात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.

चिंचवड येथील कै. दिनकर गजाबा भोईर व्यायाम शाळा येथे मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपन्न झाली. यावेळी प्रकाश जाधव, नकुल भोईर, राजाभाऊ गोलांडे, सतीश काळे, मारुती भापकर, वैभव जाधव, वसंत पाटील, मीरा कदम, संपतराव जगताप, सुनिता शिंदे, राजेंद्र चिंचवडे, भूपेंद्र गावडे, विजय काकडे, शशिकांत आवटे, निखिल गणूचे, जयराम नाणेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Bopkhel : टॉवरच्या अडथळ्यामुळे 100 काेटींच्या पुलाची रखडपट्टी

मागील पाच महिन्यांपासून पासून मराठा समाज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या मागणीसाठी विविध प्रकारचे आंदोलन करत आहे. आरक्षणाची मागणी मान्य करतो मराठा समाजास कुणबी नोंदी तपासून कुणबी दाखले देतो, आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेतो, मराठा व कुणबी दाखले असणाऱ्या मराठा नातेवाईक सगे सोयरे यांना सरसकट कुणबी दाखले देणे यासाठी मार्ग काढतो, अशी विविध आश्वासने राज्य शासनाने दिली. मात्र या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे निर्णायक आंदोलन केले जाणार आहे.

24 जानेवारी रोजी ही पदयात्रा सकाळी सांगवी फाटा येथे येणार आहे. तिथून पुढे रक्षक चौक, जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, पदमजी पेपर मिल मार्गे चापेकर चौक चिंचवडगाव मार्गे चिंचवड स्टेशन, खंडोबा मंदिर, आकुर्डी, निगडी, भक्ती शक्ती समूह शिल्प, तळेगाव मार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी जाणार आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात जरांगे पाटील व आंदोलकांचे उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. ही पदयात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मराठा स्वयंसेवक हजारोंच्या संख्येने मदत करणार आहेत. पदयात्रा वाहतुकीस कोणताही अडथळा न येता पार पडावी जागोजागी आंदोलकांना जेवण पाकिटे व पाणी बॉटल यांची व्यवस्था करावी यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना, सामाजिक मंडळे, मराठा हितचिंतक व दानशूर व्यक्तींनी आपाआपल्या परिसरात पदयात्रा मार्गावर मदत केंद्रे उभारून मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजास सहकार्य करावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

यावेळी आरोग्य विषयी आंदोलकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जागोजागी आरोग्य मदत केंद्र उभारली (Pimpri)  जाणार आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.