Chandrayaan 3 : भारताचा ‘विक्रम’ चंद्रावर उतरण्यास पूर्णपणे सज्ज

ऐतिहासिक 'सॉफ्ट लँडिंग' पूर्वी लॅंडर आणि रोव्हर समोर मोठी आव्हाने

एमपीसी न्यूज – भारताचे चांद्रयान 3 सध्या चंद्राच्या सर्वात जवळच्या कक्षेत परिक्रमा करत असून (Chandrayaan 3 ) ज्या क्षणाची सर्व अंतरिक्षप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते, अशा चांद्रयानाचे विक्रम लॅंडर आज सायंकाळी चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करायचा प्रयत्न करणार आहे. परंतु चंद्रावर उतरण्यासाठी या अंतरिक्षयानाला चंद्राच्या पृष्ठभागावरील अनियमित भौगोलिक स्थितीशी सामना करावा लागणार आहे. 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणारे रशियाचे लुना 25 हे यान चंद्रावर कोसळल्यानंतर भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

सध्या चांद्रयानाने पुन्हा त्याची कक्षा कमी केली (डीऑर्बिट) असून आता 2019 साली भारताने अवकाशात सोडलेल्या चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरशी विक्रम लॅंडरचा दोन्ही मार्गांनी संवाद प्रस्थापित झाला आहे. हे ऑर्बिटर, इस्रोचा लॅंडरशी संपर्क करुन देण्यास मदत करेल. आज  23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांपासून, चांद्रयान 3 च्या लॅंडिंग सोहळ्याचे थेट प्रक्षेपण डीडी नॅशनल या दूरदर्शन वाहिनीवर पाहता येणार असल्याची माहिती रविवारी इस्रोने जारी केली. याशिवाय इस्रोच्या यूट्युब आणि फेसबुक पेजवर देखील हे प्रक्षेपण पाहता येईल.

https://twitter.com/isro/status/1693549487653048418?t=X3dzPWeVa79BAavaK4B4Vw&s=19

चांद्रयान 3 चे प्रक्षेपण झाल्यापासून इस्रो कडून सतत नवनवीन अपडेट्स दिले जात आहेत. अशातच आता संपूर्ण जगाच्या अंतरिक्ष (Chandrayaan 3 ) अभ्यासासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण चांद्रयान 3 मोहिमेचे लॅंडर मॉड्युल म्हणजेच विक्रम लॅंडर, आज सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहे.

सध्या हे यान चंद्रापासून काहीच अंतरावर परिक्रमा करीत असून आज विक्रम लॅंडर हे लॅंडिंग साईटकडे कूच करेल व हळूहळू त्याचा वेग कमी करत काही मीटरच्या उंचीवर दोन इंजिनच्या साहाय्याने अवकाशात स्थिर होऊन चंद्राच्या पृष्ठभागाचे स्कॅनिंग करेल. ज्यात सर्व खड्डे, डोंगर, शिखरे, अधिक चढ व अधिक उतार वगळून योग्य अशा सपाट पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. ही प्रक्रिया 15 मिनिटे चालेल.

https://twitter.com/isro/status/1693181653273940240?t=r-nLZVdw7_-8Mq3LSu3xtg&s=19

विक्रम लॅंडर चंद्रावर उतरल्यानंतर त्याच्या आतील प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरताना लॅंडरच्या थ्रस्टर इंजिनच्या वापरामुळे चंद्रावर (Chandrayaan 3 ) धूळ उडू शकते. जी लॅंडर आणि रोव्हरला विद्युत ऊर्जा देणाऱ्या सौर पॅनेलस् वर बसली तर ते पॅनेलस् निकामी होऊ शकतात. तसेच लॅंडरच्या कॅमेऱ्यावर देखील धूळ साचू शकते. परिणामी त्या कॅमेऱ्याने टिपलेली छायाचित्रे धूसर दिसू शकतात.

21 ऑगस्ट रोजी रशियाचे लुना 25 हे यान चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरणारे पहिले अंतराळयान ठरणार होते. परंतु लँडिंगच्या एक दिवस आधीच भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेप्रमाणे या यानाशी संपर्क तुटला आणि हे यान चंद्रावर कोसळले. चंद्राच्या दक्षिण धृवावर सोडलेल्या दोन मोहिमा अपयशी ठरल्यामुळे ही‌ मोहीम खूप आव्हानात्मक ठरत (Chandrayaan 3 ) असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच आता चांद्रयान 3 च्या यशावर जगातील सर्व अवकाश संशोधन संस्थांच्या चांद्र मोहिमांचे भविष्य अवलंबून आहे.

चांद्रयान 3 च्या सुरक्षित लँडिंगसाठी एमपीसी न्यूज तर्फे शुभेच्छा !

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.