Pune : पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्रग्स तस्कर अटकेत; 10 लाखांचे मेफेड्रोन जप्त

एमपीसी न्यूज – पुण्यात मेफेड्रोन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या ( Pune)  तस्काराला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 10 लाख रुपये किंमतीचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. पुणे रेल्वे स्टेशन येथे तस्काराला पकडण्यात आले आहे.

सोहेल युनूस खोपटकर (रा. मुबंई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : चंद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक

शहरात अमली पदार्थ तस्करीचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. त्यावर पुणे पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. गेल्या 10 वर्षात गुन्हे शाखेकडून झालेली सर्वाधिक कारवाईही ठरली आहे.

आठ महिन्यात पोलिसांनी 12 कोटींचे ड्रग्स पकडले आहे. दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पथक बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. तेव्हा पोलीस नाईक सय्यद साहिल शेख व अझीम शेख यांना माहिती मिळाली की, सोहेल खोपटकर हा अंमली पदार्थ विक्रीसाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे येणार आहे.

त्यानूसार, पथकाने छापा कारवाई केली. तसेच, त्याला ताब्यात घेतले. त्याची ( Pune)  झडती घेतली असता त्याच्याकडे 10 लाख 30 हजार 600  रुपये किंमतीचे 51 ग्रॅम 430 मिली ग्रॅम एम.डी अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त करुन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.