Chandrayaan 3 : इस्रोने दिली गुड न्यूज; चंद्रावर ऑक्सिजनसह ‘हे’ आहेत महत्त्वाचे घटक

एमपीसी न्यूज : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 च्या यशस्वी (Chandrayaan 3) लँडिंगनंतर इस्रोने संपूर्ण जगाला आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. इस्रोने सांगितले की, चांद्रयानच्या रोव्हर प्रज्ञानने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन शोधले आहेत.

चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजनचा शोध सुरू आहे. इस्रोची ही माहिती संपूर्ण जगासाठी खूप आनंदादायी बातमी आहे.

आजपर्यंत कोणताही देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचू शकलेला नाही. मिशन चांद्रयान-3 अंतर्गत, भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे रहस्य जगासमोर उघड करत आहे.

23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर इतिहास रचला. लँडर विक्रम आणि रोव्हर प्रग्यानने सुसज्ज असलेल्या चांद्रयान-3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केले.

इस्रोने मंगळवारी सांगितले की, चांद्रयान-3 च्या प्रज्ञान रोव्हरवर बसवण्यात आलेल्या उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील पृष्ठभागावर सल्फरची उपस्थिती स्पष्टपणे पुष्टी केली आहे.

इस्त्रोने असेही सांगितले की या उपकरणाने अपेक्षेप्रमाणे अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन देखील शोधले.

इस्रोने सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, (Chandrayaan 3) “वैज्ञानिक प्रयोग प्रगतीपथावर आहेत… रोव्हरवर बसवलेल्या लेझर ड्रायव्हन ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील पृष्ठभागावर सल्फरची उपस्थिती स्पष्टपणे पुष्टी केली आहे.”

अपेक्षेप्रमाणे, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन देखील आढळले.

Today’s Horoscope 30 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.