Chinchwad : पूर्णानगरमध्ये दुकानांना आग; चौघांचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज – पूर्णानगर येथे दुकानांना आग लागली. यामध्ये (Chinchwad) चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 30) पहाटे घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूर्णानगर चिंचवड येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास एका दुकानाला आग लागली. आगीने काही वेळेत रौद्ररूप धारण केले. ही आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये पसरली. या घटनेत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी (Chinchwad) दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

अग्निशमन विभागाच्या जवानांनी चार मृतदेह बाहेर काढले आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Chandrayaan 3 : इस्रोने दिली गुड न्यूज; चंद्रावर ऑक्सिजनसह ‘हे’ आहेत महत्त्वाचे घटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.