Chinchwad : पूर्णानगर येथील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पूर्णानगर येथे एका हार्डवेअरच्या दुकानाला आग (Chinchwad)लागली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 30) पहाटे घडली.

चिमणाराम चौधरी (वय 45), ज्ञानुदेवी चौधरी (वय 40), स चौधरी (वय 10), भावेश चौधरी (वय 15) अशी आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, बुधवारी पहाटेच्या सुमारास चिखली मधील (Chinchwad)सचिन हार्डवेअर या दुकानाला आग लागली. याच हार्डवेअरच्या दुकानात चौधरी कुटुंब वास्तव्यास होते.

आगीने काही वेळेत रौद्ररूप धारण केले. या आगीत चौधरी कुटुंबातील चौघांचाही होरपळून मृत्यू झाला आहे. शॉटसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलातील बंब घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर अग्निशमन दलाचे उंचीवरून आग विझविण्याचे अत्याधुनिक उपकरण देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जवानांनी काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळविले. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनीही घटनास्थळी भेट दिली.

Chinchwad : पूर्णानगरमध्ये दुकानांना आग; चौघांचा होरपळून मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.