Pune : राहिताई पोपेरे यांच्याकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना धान्याची राखी

एमपीसी न्यूज : आज रक्षाबंधन! बहिण-भावाच्या प्रेमाचे अनोखे बंधन (Pune)जपणारा सण. सामाजिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात आजचा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे.

त्याच दरम्यान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बीजमाता पद्मश्री राहिताई पोपेरे यांनी धान्यापासून राखी पाठवून चंद्रकांत पाटील यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राहिताईंच्या या अनोख्या भेटीबद्दल भावना व्यक्त करताना चंद्रकांत (Pune) पाटील म्हणाले की, सामाजिक जीवनात काम करताना अनेक माता भगिनींचे आशीर्वाद सदैव मिळत असतात.

पण त्यातील हृदयस्पर्शी असतात, ते बीजमाता राहिताई पोपेरे यांचे ! आपल्या पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक करणाऱ्या राहिताई दरवर्षी आठवणीने धान्यापासून बनवलेली राखी पाठवून आशीर्वाद देत असतात.

राहिताईंचं कार्य इतकं मोठं आहे की, त्याला कशाचीच उपमा नाही. पण रक्षाबंधनात भावाने बहिणीला ओवाळणी द्यायची आपली प्रथा आहे.त्यामुळे राहिताईंचा वसा पुढे सतत सुरू ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिन अशी यानिमित्ताने ग्वाही देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Chinchwad : पूर्णानगर येथील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.