Today’s Horoscope 30 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग -Today’s Horoscope 30 August 2023
वार – बुधवार.
30.08.2023
शुभाशुभ विचार – 11 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष- नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र- धनिष्ठा .
चंद्र राशी – मकर.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- निळा )
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासून च्या तुमच्या काही इच्छा पूर्ण होतील. वाहन वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )
उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून आज सर्व कामे सुरळीत पार पडतील. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रात यशस्वी नेतृत्व कराल.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा )
महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांत आज वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होऊ शकते. कायद्याची चौकट मोडणे ही महागात पडेल.

कर्क (शुभ रंग- मरून)
विश्वासू माणसाकडून ही विश्वासघात होईल. आज मित्रही तुम्हाला दगा देतील. कार्यक्षेत्रात ही सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

सिंह (शुभ रंग- केशरी )
आज चैनी व विलासी वृत्ती बळावेल. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील.

कन्या ( शुभ रंग- मोरपंखी)
स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढेल. आज प्रेम प्रकरणात फसवणूक संभवते.

तूळ ( शुभ रंग- हिरवा)
आज काम कमी पण दगडगच जास्त होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.

वृश्चिक (शुभ रंग- गुलाबी)Today’s Horoscope 30 August 2023
धंद्यातील येणी वसूल होतील. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगलीच जमेल. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व तुम्ही सिद्ध करू शकाल.
धनु (शुभ रंग- मोतिया)
आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घेऊन बसाल. आज प्रवासात काही नवे हितसंबंध जुळून येतील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.

मकर ( शुभ रंग- राखाडी )
आवक पुरेशी असली तरीही बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. क्षुल्लक कारणांवरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्या फार खोलात शिरू नका.

कुंभ (शुभ रंग – सोनेरी)
आज तुमची तब्येत थोडीशी नरम असेल. क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घ्याल. आज जशास तसे या धोरणाने वागा. मोफत सल्लागार मंडळींना दोन हात दूरच ठेवा.

मीन (शुभ रंग – निळा )
पर्यटनाचे, वाहतुकीचे व्यवसाय चांगले चालतील. घरात आज थोरमंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे थोडी भटकंती होईल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Kelgaon : राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त जोग स्पोर्ट्स अकॅडमीत क्रिडा स्पर्धा संपन्न

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.