Pune : पिरंगुट येथे महिलांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय पुणे (Pune)आणि आणि नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठाण संचलित औद्यागिक प्रशिक्षण संस्था पिरंगुट यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 24) जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठाण संचलित औद्यागिक प्रशिक्षण संस्था पिरंगुट ता. मुळशी येथे महिलांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध (Pune)नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून त्यांच्याकडून एक हजारापेक्षा अधिक रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत पात्रताधारक महिला उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

Express Way : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बुधवारी दोन तास ब्लॉक

नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहितीसाठी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस येताना सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.

जिल्ह्यातील अधिकाधिक महिला उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.