Pune : अटल युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी महेश शिळीमकर यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – अटल युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा ग्रामीण (Pune) अध्यक्षपदी महेश पांडुरंग शिळीमकर यांची 20 जून रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधांशु मिश्रा व  महाराष्ट्राचे प्रदेश  अध्यक्ष संदीप बडे यांनी हे नियुक्ती पत्र शिळीमकर यांना सुपुर्द केले आहे.

महेश शिळीमकर हे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते वसंत वाणी यांचे ते अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. यांच्याकडून शिळीमकर यांनी राजकीय शिक्षण घेतले.  शिळीमकर हे स्नेराज फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत.  महेश शिळीमकर यांच्या घराण्याला राजकीय वारसा आहे.

Chakan : चाकण मध्ये शांतता समितीची बैठक संपन्न

त्यांचे मोठे बंधू राजेश शिळीमकर मावळ तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष होते. त्यांचे चुलते बाळासाहेब शिळीमकर  यांनी दोन वेळा तळेगाव दाभाडे नगर परिषदेची निवडणूक लढवली होती व ते सुद्धा तालुका भाजपाचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या आजी जनसंघाची नगरसेविका होत्या.

शिळीमकर हे मागील 10 ते 15 वर्षांपासून भाजपामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या राजकीय अनुभव  व  वारसा नंतर त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याविषयी एमपीसी न्यूज शी बोलताना  महेश शिळीमकर म्हणाले की, लोकांसाठी व समाज कल्याणासाठी हे पद मिळाले आहे. या जबाबदारीची मला पुर्ण जाणीव असून, यातून सकारात्मक कामे करेन, असा (Pune) विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.