Pune : हिंदू जनजागृती समितीतर्फे ‘संस्कार’ वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप

एमपीसी न्यूज – हिंदू जनजागृती समितीतर्फे (Pune ) बुधवारी (दि.21) वनाज परिवार शाळा, पौड रोड, कोथरूड येथे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारे ज्ञान अंतर्भूत असणार्‍या 300 ‘संस्कार’ वह्यांचे विनामूल्य वाटप सुहृद गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले.

Pune : अटल युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी महेश शिळीमकर यांची नियुक्ती

राष्ट्राची भावी पिढी आदर्श व्हावी, यासाठी त्यांच्यावर चांगले संस्कार करणे, तसेच त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देऊन त्यांच्यातील राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘व्यक्तीमत्त्व विकास शिबीरे’, क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याची अन् शौर्याची माहिती देणार्‍या प्रदर्शनांचे आयोजन करणे अश्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

अशा सामाजिक उपक्रमांची आणि साहाय्याची या मुलांना अत्यंत आवश्यकता असून हिंदू जनजागृती समितीने यासाठी चालवलेले कार्य हे आजच्या काळाची आवश्यकता आहे, असे मत या वेळी शाळेतील शिक्षकांनी (Pune ) व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.