Talegaon Dabhade : जैन बांधवांच्या चार्तुमासानिमित्त तळेगाव येथे साधु – साध्वींचा प्रवेश व मिरवणूक

एमपीसी न्यूज – जैन बांधवाच्या चातुर्मासाला लवकरच सुरुवात होणार (Talegaon Dabhade) असून या पार्श्वभूमीवर तळेगाव येथील तळेगाव स्टेशन परिसरात जैन समाजाच्या नागरिकांनी साध्वी यांचा प्रवेशाचा उत्सव साजरा करत आज (शनिवारी) मिरवणूक काढली. सकाळी सात वाजता तळेगाव येथील बीएसएनएल ऑफीस पासून शांतिनाथ जैन मंदिर पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी आचार्य हर्ष सागजी यांचे शिष्य रत्न मुनीश्री हीर सागरजी तसेच बालमुनी वीर भद्र सागरजी, साध्वी नेहवर्षा श्रीजी, साध्वी नीतवर्षा, साध्वी भक्ती आदी उपस्थित होते. तळेगाव स्टेशन जैन सकल संघामध्ये दोन साधुजी, 5 साध्वीजी व तीन मुमुक्ष यांचे चातुर्मासानिमीत्त भव्य प्रवेश कऱण्यात आला. यावेळी रॅलीचे ही आयोजन करण्यात आले होते. याचे आयोजन जैन सकल एंव नुतन विश्वस्त मंडळ व ऋषभ शांती विहार ग्रुप संघ यांनी केले होते.

Pune : हिंदू जनजागृती समितीतर्फे ‘संस्कार’ वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप

यावेळी रॅलीमध्ये वृद्ध श्रावक श्रावीका, लहानमुले, स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. यावेळी महिलांनी लाल रंगाच्या साड्या तर पुरुषांनी पांढरे कपडे परिधान केले होते. यावेळी हातात जैन ध्वज हाती घेऊन सर्वांनी घोषणा दिल्या.

मिरवणूक संपल्यानंतर सर्वांनी प्रवचनाचा आनंद घेतला. दरवर्षी चार महिन्याचा चातुर्मास असतो परंतू यावर्षी अधिक मासामुळे हा चातुर्मास पाच महिन्यांचा असणार आहे. या चातुर्मासात प्रवचन, उपासना, तप,आंबील, अठाई आदी गोष्टी केल्या जातात, अशी माहितीश्री शांतीनाथ आदिनाथ जैन सकल संघातर्फे सांगण्यात (Talegaon Dabhade) आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.