Pune : मला समजलेले ‘बापू’ विषयावरील निबंध स्पर्धेत 100 हून अधिक शाळांचा सहभाग

एमपीसी न्यूज – राजीव गांधी स्मारक समिती व पुणे शहर माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने ( Pune) आयोजित, इ. 8 वी ते 10 वी (माध्यमिक शाळांमधील) विद्यार्थ्यांकरीता “*मला समजलेले बापू अर्थात महात्मा गांधी*” विषया वरील निबंध स्पर्धां कालखंड सुरू झाला असून, पुणे शहर परीसरातील 125 शाळांमध्ये, राजीव गांधी स्मारक समितीचे कार्यकर्ते पोहोचले आहेत. शाळांकडुन देखील चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तसेच ‘निबंध स्पर्धेची’ माहीती देणारे बॅनर्स ही लावण्यात आले आहेत. शाळा प्रशासनाकडून ‘स्मारक समिती सदस्यांना’ सन्मानाची वागणूक व सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पर्धेचे संयोजक व निमंत्रक गोपाळ तिवारी यांनी सांगितले. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, स्वातंत्र्याकरीता शहीद झालेल्यांचे योगदान व ‘स्वतंत्र – भारताची’ उभारणी इ बाबत विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेच्या माध्यमातून अंतर्मुख करण्याचा अल्प प्रयत्न आहे. महात्मा गांधींच्या विशाल नेतृत्व व व्यक्तिमत्वाचे, बापूंच्या सत्य, अहिंसा, मानवता आदी असाधारण गुणांचे, स्वातंत्र्य लढ्याच्या अनेक पैलु व प्रसंगांचे, त्यांना लाभलेली जागतिक मान्यता, मानवी जीवना विषयीच्या दृष्टीकोनाचे व त्यांनी अंगीकारलेल्या मूल्यांची माहीती व त्यायोगे विद्यार्थ्यांचे ठायी राष्ट्रभक्ती भावना जडावी, या उद्देशाने ही निबंध स्पर्धा आयोजित करत असल्याचे राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अघ्यक्ष गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

Chikhali : गॅस चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा

माजी शिक्षण संचालक दिगंबर देशमुख, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप, पुणे शहर माध्यमिक व ऊच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष  सुजीत जगताप, सरचिटणीस शिवाजी कामठे, कार्याध्यक्ष शिवाजी शिंदे, विजय कचरे, सचिन दुर्गाडे, नंदकुमार सागर आदींच्या अतुलनीय मार्गदर्शन व सहकार्याने या स्पर्धेच्या आयोजनाने वेग पकडला आहे.

शाळांमध्ये निबंध स्पर्धेची माहीती पत्रक पोहोचवणे, निबंध गोळा करणे इ कार्य स्मारक समितीचे सदस्य व सहकारी कार्यकर्ते सर्वश्री ॲड स्वप्नील जगताप, गणेश शिंदे, ॲड फैयाझ शेख, धनंजय भिलारे, संदिप मोकाटे, संजय अभंग, गणेश मोरे, महाजन सर, अमर पवार बंधू, योगीराज नाईक, भारत पवार करत आहेत. कार्यालयीन समन्वय ऊदय लेले, शंकर शिर्के, नरेश आवटे आदि पहात ( Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.