Pune : धीरज साहूच्या संपत्तीत भागीदार कोण? याचा शोध यंत्रणांनी घ्यावा – हर्षदा फरांदे

एमपीसी न्यूज – काँग्रेसच्या एका राज्यसभेच्या खासदाराकडे 300 कोटींची बेहिशोबी (Pune) मालमत्ता सापडते. या 300 कोटीच्या संपत्तीत नक्की कोण कोण भागीदार आहेत, हे यंत्रणा नक्कीच शोधतील, महागाईच्या विषयावर आंदोलन करणारे काँग्रेस जनतेच्या पैशावर डल्ला मारून आपण कसे स्वच्छ असल्याचा आव आणत आहे. परंतु, खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या बेहिशोबी संपत्तीवर चकार शब्द काढत नाही. यावरून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला काँग्रेसचा पाठिंबा आहे असेच दिसून येते,’असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीच्या पुणे महिला आघाडीच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी केला.

Sangvi : संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित सांगवी येथे रक्तदान शिबिरामध्ये 171 निरंकारी भक्तांनी केले रक्तदान

पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने शहराच्या आठही मतदारसंघात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी सरचिटणीस प्रियांका शेंडगे, उज्वला गौड, (Pune) गायत्री खडके, स्वाती मोहोळ, श्यामा जाधव, आरती कोंढरे, कोमल कुटे, कांचन कुंबरे, अस्मिता करंदीकर, प्रियांका श्रीगिरी, अपर्णा कुऱ्हाडे, मनीषा मोरे व सर्व महिला उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.