Sangvi : संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित सांगवी येथे रक्तदान शिबिरामध्ये 171 निरंकारी भक्तांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज -सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने(Sangvi) पुणे झोन मधील सांगवी ब्रांच अंतर्गत संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन ढोरेनगर,जुनी सांगवी येथे 10 डिसेंबर रोजी करण्यात आले होते.

ज्यामध्ये 171 निरंकारी भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले, निरंकारी भक्तांबरोबर समाजातील अनेक सज्जनांनी सहभाग घेतला. वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी यांनी रक्त संकलन करण्याचे कार्य केले.

Pimpri : कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी माया सापडलेल्या काँग्रेस खासदारा विरोधात भाजपची निदर्शने

शिबिराचे उदघाटन श्री ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रमुख) यांच्या (Sangvi)शुभहस्ते संपन्न झाले. उदघाटन प्रसंगी बोलताना श्री करमचंदानी म्हणाले कि, संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर 1986 मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे. दरम्यान सांगवी विभागातील अनेक नगरसेवक, समाजसेवकांनी शिबिराला सदिच्छा भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले. मिशनचे गिरीधारीलाल मतनानी ( संयोजक पिंपरी) तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या 15 दिवसांपासून समाजामध्ये रक्तदानाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी मिशनच्या सेवादारांनी सांगवी परिसरामध्ये रॅलीच्या माध्यमातून तसेच घराघरामध्ये जाऊन जनजागृती केली. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशनचे अनुयायी यांचे योगदान लाभले. आलेल्या सर्व रक्तदात्यांचे आणि मान्यवरांचे आभार सांगवी ब्रांच प्रमुख दत्तात्रय शेळके यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.