Purandar : अधिवेशनात दूध उत्पादकाला न्याय मिळवून द्या, आंदोलकांची मागणी

एमपीसी न्यूज : पुरंदर येथील पिसर्वे गावातशनिवार दिनांक 9 डिसेंबर रोजी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दूध संघर्ष अभियान-आंदोलन (Purandar) राबविण्यात आले. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत उपस्थित होते. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला उत्पादन खर्चावर 15 टक्के नफा गृहीत धरून दर मिळावा, ऊसाच्या धर्तीवर दुधाला एफआरपीचे कायदेशीर कवच देण्यात यावे, दूध दर मूल्य आयोगाची स्थापना करून त्यास वैधानिक दर्जा देण्यात यावा, पशुखाद्य दरावर शासनाचे नियंत्रण असावे अशा मागण्या करण्यात आल्या.  

मुकुंद किर्दत म्हणाले, कि  सरकारने 34 रुपये प्रति लिटरचा दूध खरेदी दर जाहीर केला. परंतु, दूध संघ आणि कंपन्या यांनी हात मिळवणी करून आज दूध दर पाडण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला दिसतोय. या दूध प्रक्रिया उद्योगांच्या मनमानी कारभाराला वेसण घालण्याची गरज आहे. दुधावर मोठे झालेले बोके सरकारमध्ये असून त्यांनीच शेतकऱ्याचा जोडधंदा तोट्यात आणला आहे. शेतकरी प्रश्नांवर ते संवेदनशील नाहीत.

Sangvi : संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित सांगवी येथे रक्तदान शिबिरामध्ये 171 निरंकारी भक्तांनी केले रक्तदान

या वेळी मार्गदर्शन करताना शेती अभ्यासक (Purandar) सतीश देशमुख यांनी दुधाचे अर्थकारण समजून सांगताना येणाऱ्या काळात कायदेशीर लढा देणार असल्याचे सांगितले. तसेच आप पुरंदर अध्यक्ष दत्तात्रय कड यांनी शेतकऱ्याच्या आजच्या दयनीय आर्थिक परिस्थितीला सरकारची शेतकरी हिताच्या विरोधातील धोरण व प्रस्थापित पक्ष आणि नेते जबाबदार असल्याचे सांगत अधिवेशनात सरकारने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली.

सागर जाधव यांनी तात्काळ उपाययोजना म्हणून 3.2 फॅट 8.3 snf दुधाला  34 रुपये दर मिळावा अशी मागणी केली. अभियानास पंचक्रोशीतील उपस्थित शेतकऱ्यांनी समस्या मांडून सरकारी धोरणांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.