Pune : महानगरपालिकेतील एकवट मानधनावरील कर्मचारी कायमस्वरूपी रुजू होण्याच्या प्रस्तावाला मान्यता

दीपक मानकर यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिका एकवट मानधनावरील सेवकांना मनपामध्ये (Pune) कायमस्वरूपी रुजू होण्यासाठीचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाचा आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो. अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले असून प्रस्तावाला महायुती सरकारने मंजुरी दिली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली.

मंजुरी मिळाल्यानंतर सर्व कर्मचारी अतिशय आनंदात होते. पुणे मनपामध्ये कायम सेवेत रुजू होण्यासाठी आज्ञापत्र देखील महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने पारीत करण्यात आले आहे. आता सर्व १४९ सेवक पुणे मनपामध्ये रुजू झालेले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांनी मानकर यांची भेट घेत, आभार मानत आपला आनंद व्यक्त केला. याप्रसंगी सर्वांचे अभिनंदन करून त्यांना मानकर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Purandar : अधिवेशनात दूध उत्पादकाला न्याय मिळवून द्या, आंदोलकांची मागणी

आपण प्रामाणिकपणे करत असलेल्या कामाची पावती आपल्या लोकांना मिळाल्याचा आनंदच असतो. आपल्या लोकांच्या चेहर्‍यावरील आनंदापेक्षा दुसरे कुठलेही समाधान (Pune) नाही, असेही दीपक मानकर यांनी सांगितले. यावेळी सागर उत्तम काशिद, सुभाष मालसिंग नागवडे, विजया गायकवाड, सुनिता मोरे, सुमित जगताप यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.