Sangvi : सांगवी परिसरातील मराठी शाळांना संगणक भेट

एमपीसी न्यूज –  शिक्षणाची ज्ञानगंगा  घरोघरी … ग्रंथ हेच गुरु … शिकाल तर जगाल हे (Sangvi )उद्दिष्ट ठेवून सांगवी परिसर महेश मंडळ व व्हेरिटास सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने परिसरातील शाळांना संगणक व शालेय साधनांचे वाटप करण्यात आले.

सांगवीतील नृसिंह हायस्कूल, दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कासारवाडी (Sangvi)येथील ज्ञानराज विद्यालयास प्रत्येकी 20 संगणक संच अदयावत संगणक कक्षासहित सुमारे 36 लाख रुपये किमतीच्या या संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन कंपनीचे अधिकारी विजय म्हसकर, संजय माथुर, स्वप्ना थेटे हस्ते  फीत कापून करण्यात आले. यावेळी कंपनीचे भानू महंती, निमेश मोमया, फरीदुद्दीन शेख, अश्विन आपटे, सुवर्णा इनामदार, माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, आशा शेंडगे, सांगवी परिसर महेश मंडळाचे अध्यक्ष सत्यनारायण बांगड, सतीश लोहिया निलेश अटल आणि महेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संगणकाबरोबर सांगवी परिसर महेश मंडळाने संगणक कक्षास कार्पेट, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी स्टूल, शास्त्र प्रयोगशाळे करिता लागणारे साहित्यही भेट दिले.
विजय म्हसकर म्हणाले, सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी चालणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा पुरवल्या गेल्या तर असे विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन भविष्यात त्यांचे जीवनमान उंचवू शकतात. त्यामुळेच आमची कंपनी असे शैक्षणिक उपक्रम राबवत असते.

Mahalunge: डी मॅट खाते चालवण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 12 लाखाची फसवणूक

सतीश लोहिया म्हणाले, सांगवी परिसर महेश मंडळाच्या वतीने समाजभिमुख उपक्रम जसे की शालेय शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर  वर्षभर राबविले जातात. मागील सहा वर्षापासून आम्ही व्हेरिटास कंपनीच्या सहकार्याने शाळांना मदत करत आलो आहोत. याप्रसंगी स्वामी विवेकानंद विद्यामंदिरचे मुख्याध्यापक रवींद्र फाफाळे, नृसिंह प्रशालेचे अशोक संकपाळ, ज्ञानराज विद्यालयाच्या उर्मिला थोरात आणि शिक्षक वर्ग यांनी या साहित्याचा स्वीकार केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.