Sangvi : रस्ता दुभाजकाला कार धडकून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  रस्ता दुभाजकाला कार धडकून तरुणाचा मृत्यू  झाला(Sangvi) आहे. ही घटना पिंपळे निलख येथे बुधवारी (दि.21)  घडली आहे.

स्वप्नील पुष्कराज जोशी याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून साहिल संजय चौधरी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

Chikhali : दुकानातील कामगारांनी केला दहा लाखांचा अपहार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र (Sangvi)स्वप्नील जोशी, साहिल चौधरी हे जेवणासाठी पाषाणला गेले होते. जेवून ते कारमधून सांगवीला येत होते. यावेळी साहिल गाडी चालवत होता. त्याचा कारवरून ताबा सुटला व कार थेट रस्ता दुभाजकावर आदळली.

 

यात गाडीचे नुकसान झाले. या अपघातात स्वप्नील जोशीचा मृत्यू झाला आहे. तर फिर्यादी या किरकोळ जखमी झाल्या आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.