Alandi : हातोड्याने डोक्यात मारत एकाची हत्या

एमपीसी न्यूज – एका 36 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात हातोडीने (Alandi)मारून त्याचा खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. 23) खेड तालुक्यातील चिंबळी येथे घडली.

राहूल सुदाम गाडेकर (वय 36) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव (Alandi)आहे. गणेश रामनाथ कदम (वय 40, रा. चिंबळी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Mumbai: मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा राहूल हे शुक्रवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास कुरुळी गावातील बर्गेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. त्यावेळी अज्ञाताने त्यांच्या डोक्यात हातोडी आणि इतर हत्यार मारून खून केला आहे. तसेच पुरुवा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.