Pimpri : विवाह सोहळ्यातून फोटोग्राफरचा कॅमेरा पळवला

एमपीसी न्यूज – पिंपरी येथे एका विवाह सोहळ्यातून (Pimpri)फोटोग्राफी करण्यासाठी आलेल्या फोटोग्राफरचा कॅमेरा चोरट्याने पळवून नेला. ही घटना 28 जानेवारी रोजी सिंध नवजवान सेवा मंडळ येथे घडली.

सुशांत दिलीप गायकवाड (वय 23, रा. थेरगाव) यांनी (Pimpri)याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Mahalunge : सुपरवायजरकडे तक्रार केल्याच्या रागातून सहकाऱ्यावर जिवघेणा हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड यांनी 28 जानेवारी रोजी सिंध नवजवान सेवा मंडळ येथे होणाऱ्या विवाह समारंभाची फोटोग्राफीची ऑर्डर घेतली होती. ते फोटोग्राफी करण्यासाठी कामावर गेले असता दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वरपक्षाच्या रूममध्ये त्यांनी त्यांचा 60 हजार रुपये किंमतीचा कॅमेरा चार्जिंगला लावला. चोरट्याने चार्जिंगला लावलेला कॅमेरा काढून चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.