Akurdi: दोन दुकाने व सात सदनिकांचा ताबा न देता नागरिकाची सव्वा तीन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – दोन दुकाने व सात सदनिका यांचा ताबा न देतो एका 55 वर्षीय (Akurdi)नागरिकाची  सव्वा तीन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना 7 फेब्रुवारी 2016 ते 25 सप्टेंबर 2023 या कालावधीत आकुर्डी व चोविसावाडी येथे घडली आहे.

याप्रकरणी हनुमंत माधव दरेकर (वय 55 रा.मांजरी,हवेली.) यांनी दिघी पोलीस (Akurdi)ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून  नितीन शंकर धिमधिमे (वय 44 ) मकरंद सुधीर पांडे (वय 46) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Mahalunge: डी मॅट खाते चालवण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 12 लाखाची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,, फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून थेरगाव येथील रहिवासी प्रकल्पामधील फ्लॅट व दोन दुकाने हे खरेदी करण्यासाठी करारनामा करून देऊ सांगितले. यासाठी 3 कोटी  25 लाख 6 हजार 58 रुपये घेतले. मात्र त्यानंतर करारनाम्यानुसार दुकाने व सदनिकांचा ताबा न देता फिर्यादींची फसवणूक केली. यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.