Pimpri : कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी माया सापडलेल्या काँग्रेस खासदारा विरोधात भाजपची निदर्शने

एमपीसी न्यूज – कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी माया (Pimpri )सापडलेले काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याविरोधात पिंपरी-चिंचवड शहर भाजपने आंदोलन केले. साहू यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. घोषणाबाजी करून या प्रकाराचा निषेध नोंदविण्यात आला.

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली (Pimpri )पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज (सोमवारी) आंदोलन पार पडले. महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, प्रदेश सचिव कविता हिंगे, वैशाली खाडये, माजी नगरसेवक सागर अंघोळकर, संतोष तापकीर, सतीश नागरगोजे, देवदत्त लांडे, मनोज ब्राम्हणकर, नंदू कदम, बाळासाहेब भुंबे, मुकेश पुडासमा, दिपक भंडारी, बाळासाहेब भुंबे, विजय ‍शिनकर, अलका मकवाना, दिपाली तारसकर, मंगल आढाव, लक्ष्मी काची, जयश्री मकवाना, कोमल शिंदे, दिपाली कलापुरे, विद्या माळी, जयश्री वाघमारे, रेखा काटे, दिपाली केंगारे, विजयश्री नन्नावरे, रोहीणी रासकर ‍निलम दळवी, पल्लवी पाठक, कमलेश बाहरवाल, निता कुशारे, अंजली पांडे, चेतना मुंदाणकर, श्रीमती ‍मिनल आदी उपस्थित होते.

Pune : शनिवारवाडा परिसरात असलेल्या जुन्या वाड्यांचे पुनर्विकास आवश्यक : नगरसेवकांची माहिती

आयकर विभागाने 6 डिसेंबर रोजी मद्य निर्मिती कंपनी बलदेव साहू आणि समूहाच्या झारखंड आणि ओडिशामधील 10 ठिकाणी छापे टाकले. आयकर विभागाने बोलंगीर कार्यालयापासून 30 किमी अंतरावर असलेल्या बलदेव साहू कंपनीच्या सातपुडा कार्यालयावर छापा टाकून 200 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घर आणि कंपनीच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने धाडी टाकून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती जप्त केल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.