Chikhali : गॅस चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – अवैधरीत्या मोठ्या सिलेंडर मधून (Chikhali) लहान सिलेंडरमध्ये गॅस काढून घेत त्याची चोरी करणाऱ्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 9) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोरेवस्ती चिखली येथे केली.

सागर रमेश वाघमारे (वय 25), अजय जैन, मुकेश ट्रेडर्स (सर्व रा. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : 16 दिव्यांग दाम्पत्यांचा सामुदायिक विवाह सोहळा थाटामाटात संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर याने त्याचा मालक अजय जैन याच्या सांगण्यावरून मुकेश कडून गॅसचे सिलेंडर विकत घेतले. त्यामध्ये घरगुती सिलेंडर मधून अवैधरीत्या कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता गॅस काढला. याबाबत (Chikhali) माहिती मिळाली असता अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी सायंकाळी छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 27 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.