Pune News : पुण्यात थोडक्यात टळला ‘सुखोई’ विमानाचा अपघात

एमपीसी न्यूज – भारतीय हवाईदलाच्या ताफ्यातील सुखोई – 30 – एमकेआय या लढाऊ (Pune News) विमान नियमित प्रशिक्षणानंतर धावपट्टीवर उतरत असताना विमानात अचानक बिघाड झाला. मात्र वैमानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने हा अपघात थोडक्यात टळला आहे. पुण्यातील लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशनवर ही घटना घडली.

 

Redzone: रेड झोनचा मुद्दा विधानपरिषदेत; नव्याने नकाशा जाहीर करण्याची आमदार सचिन अहिर यांची मागणी

 

नियमित प्रशिक्षणानंतर विमान धावपट्टीवर उतरवताना झालेल्या तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या काही तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकांना हे गतीअवरोध तंत्र वापरण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे विमानाला कोणतीही इजा झाली नाही. यावेळी काही वेळासाठी बंद ठेवण्यात आलेली धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून घटनेच्या सखोल तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. हवाईदलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर आशिष मोघे यांनी या घटनेबाबत माहिती दिली.

 

विमानासाठी गतीअवरोध तंत्राचा म्हणजेच एअरक्राफ्ट अरेस्टर बॅरिअर वापर करुन अपघात टाळण्यात वैमानिकांना यश आले आहे. अरेस्टर बॅरिअर ही विमानाचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी नियोजितपणे वापरली जाणारी प्रणाली आहे. मात्र, या घटनेदरम्यान अचानक (Pune News) आलेल्या तांत्रिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तिचा वापर करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.