Redzone: रेड झोनचा मुद्दा विधानपरिषदेत; नव्याने नकाशा जाहीर करण्याची आमदार सचिन अहिर यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात असलेल्या संरक्षण (Redzone) विभागाच्या रेडझोन क्षेत्राबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट असून बांधकाम करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेड झोनचा सविस्तर असा नकाशा प्रसिद्ध करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार  सचिन अहिर यांनी विधानपरिषदेत केली.

 

 

 

Talegaon Dabhade : जागतिक चिमणी दिवस इंद्रायणी महाविद्यालयात उत्साहात साजरा

 

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, रूपीनगर यासह विविध भागात संरक्षण विभागाने रेड झोन हद्द घोषित केली आहे. मात्र, रेड झोनचे अंतर हे सर्व ठिकाणी वेगवेगळे आहे. त्यामुळे नागरिकांना घरे बांधताना किंवा बांधकाम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेड झोनमध्ये जागा असल्याने बांधकाम करता येत नाही. तसेच, बॅंका बांधकामासाठी कर्ज देत नाहीत. रेड झोनच्या अंतराबाबत संभ्रम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. यामध्ये स्पष्टता यावी यासाठी शहरातील रेड झोडचा सविस्तर नकाशा प्रसिद्ध करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख सतीश मरळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली होती. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका व संबंधित विभागांना आदेश दिले होते. मात्र, पुढे त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही.
नागरिकांच्या घरांशी निगडीत असलेल्या हा मुद्दा आमदार अहिर यांनी अधिवेशनात (Redzone) विधानपरिषदेमध्ये उपस्थित केला. रेड झोन हद्दीचा सविस्तर नकाशा जाहीर करण्याची विनंती त्यांनी सभागृहास केली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.