Pune News : अवैध मद्य विक्री व मद्य सेवन करणाऱ्या विरुद्ध विशेष मोहीम

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे 68 व 84 कलमांनुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध (Pune News)जिल्ह्यात 7 ते 9 जानेवारी दरम्यान विशेष मोहिम राबवून एकूण 29 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाने दिली आहे.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर 25 आरोपींना दोषी ठरविण्यात आले असून न्यायालयाकडून या आरोपींना एकूण 37 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. यापूर्वीही अशी विशेष मोहिम राबविण्यात आली होती.

Mahavitaran News : महावितरणाच्या विलासराव देशमुख अभय योजनेचा 43 हजार ग्राहकांना लाभ

याशिवाय अवैध मद्य निर्मिती वाहतूक व विक्रीचे समूळ उच्चाटन करण्यासोबतच गुन्हेगारांना वचक बसविण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने चालू वर्षामध्ये 382 सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केलेले आहे. तसेच एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठी एकूण 17 प्रस्ताव व मोक्काअंतर्गत 2 प्रस्ताव संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. अधिक दराने मद्य विक्री करणारे दारु विक्री दुकान व देशी दारु बार अनुज्ञाप्तीधारकाविरुद्ध एकुण 10 विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्रीबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्र.18002339999 व दुरध्वनी क्र. 020-26058633 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपुत यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.