Pune : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कात्रज परिसरात बनावट स्कॉचच्या कारखान्यावर छापा

एमपीसी न्यूज – राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कात्रज परिसरात ( Pune ) देहू रोड बायपास आंबेगाव येथे बनावट स्कॉचच्या कारखान्यावर शनिवारी (दि.12) छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही बनावट स्कॉच केवळ पुणे नाही तर मुंबई सह इतर शहरात देखील पाठवली जात होती.

महेशभाई हरिभाई कोळी (रा. मंगळवार पेठ, पुणे ) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Maharashtra : शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत – उपमुख्यमंत्री अजित पवार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज देहू रोड बायपास, या ठिकाणी छापा घातला असता, या ठिकाणी बनावट परदेशी स्कॉचच्या एकूण 34 सिलबंद बाटल्या, दोन दुचाकी वाहने, 551 रिकाम्या बाटल्या, बाटल्यांचे बुचे, मोनोकार्टून, हिट गन (हेअर ड्रायर), इंडक्शन (शेगडी), प्लॉस्टिक पॅकिंग रोल, प्लॉस्टिक चिकटपटटी आणि मोबाईल फोन असा एकुण अंदाजे 10 लाख 39 हजार 474 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

परदेशी बनावटीचे मद्य वापरण्यात आलेल्या रिकाम्या बाटल्यातून पुन्हा भरून त्याची विक्री केली जात होती. या मद्य पार्सलद्वारे मुंबई व इतर शहरामध्ये पाठविले जात होते तसेच दुचाकीचा वापर करून पुणे शहरात त्याची विक्री केली जात होती, अशी माहिती आरोपीने दिली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक, आर.पी.शेवाळे, दुय्यम निरीक्षक एन.एन. मारकड, सहायक दुय्यम निरीक्षक एस.एस. लोहकरे, एस.एस. इंदलकर जवान-नि-वाहनचालक, जवान शरद भोर, गोपाल कानडे, व महिला जवान उज्वला भाबड यांनी केली. याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क सी विभागाचे निरीक्षक राजाराम प्रभु शेवाळे हे करीत ( Pune ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.