Pune : खेड-शिवापूर येथे 82 लाखांचे मद्य राज्य उत्पादन शुल्काकडून जप्त

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कारवाई

एमपीसी न्यूज – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ( Pune) खेड शिवापूरजवळ  82 लाख रुपये किंमतीच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.  हा मद्यसाठा गोव्यावरून बेकायदेशीररित्या पुण्याला पाठविण्यात येत होता.  ही कारवाई मंगळवारी (दि.19) पहाटे केली. यावेळी पोलिसांनी मद्य वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक जप्त करुन ट्रक चालक विपुल देवीलाल नट (वय 32, रा. देवीलालजी नट, रोहिणीया, बासवाडा, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील मद्य स्वस्त आहे. गोव्यातील मद्य अन्य राज्यात विक्रीस मनाई करण्यात आली आहे. गोव्यातील मद्याचा साठा पुण्यात पाठवण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुंबई-बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्याजवळ सापळा लावला होता.

Chakan : चाकण एमआयडीसीमध्ये दोन स्विचिंग स्टेशन्स कार्यान्वित

मंगळवारी पहाटे साताऱ्याहून पुण्याकडे ट्रक निघाला होता. पथकाने खेड शिवापूर टोल नाक्याजवळ ट्रक अडवला. ट्रक चालकाकडे ट्रकमधील मालाबाबत चौकशी केली. त्याने औषधांची वाहतूक केली जात असल्याचे सांगितले. पथकाने ट्रकची तपासणी केली असता त्यातील खाेक्यात मद्याच्या बाटल्या आढळल्या. गोव्यातील मद्याची महाराष्ट्रात विक्री करता येत नाही. त्यामुळे, यासंदर्भात महाराष्ट्र दारूबंदी नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक ए. सी. फडतरे, जवान अमर कांबळे, अहमद शेख, एस. एस. पोंधे, अनिल कांबळे यांच्यासह पथकाने केली ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.