Chakan : चाकण एमआयडीसीमध्ये दोन स्विचिंग स्टेशन्स कार्यान्वित

औद्योगीक व घरगुती वीज वापरकर्त्यांना दिलासा

एमपीसी न्यूज – महावितरणने सोमवारी (दि.18) चाकण एमआयडीसीमध्ये दोन स्विचिंग स्टेशन (Chakan ) कार्यान्वित केले आहेत. हे दोन स्विचिंग स्टेशन्स कार्यान्वित झाल्यामुळे 7 हजार 783 औद्योगिक, व  88 हजार 84 घरगुती व वाणिज्यिक 9 हजार 549 ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला होता.

या कार्यक्रमास पुणे विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज सचिव दिलीप बटवाल, अधीक्षक अभियंता जरग, खेडचे कार्यकारी अभियंता एडके व उपकार्यकारी अभियंता गारगोटे व अनेक कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जे फीडर ओव्हरलोड आहेत त्यांचा लोड कमी करून त्यांना स्ट्रॉंग केले जात आहे व त्याचबरोबर जे फीडर अंडर लोड आहेत त्यांना स्ट्रॉंग करण्यासाठी या स्विचिंग स्टेशनचा उपयोग होणार आहे. इज ऑफ डूइंग च्या पॉलिसी प्रमाणे कालबद्ध रिपेअर चे काम करून अखंडित वीजपुरवठा सेवा चाकण, एमआयडीसी व परिसरात दिल्या जाणार आहे. अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर MSEDCL चे सीएमडी संजीव कुमार यांनी पुणे ग्रामीण विभागाचे MSEDCL चे स्वरूप  समजावून घेऊन तात्काळ चाकण एमआयडीसी व परिसरासाठी 500 कोटी रुपयांची कामे मंजूर केली होती.

त्यातून एमआयडीसी परिसरात MSEDCL चे स्वरूप सुधारण्यासाठी अनेक कामे केलेली आहेत त्यात आजचे कामही समाविष्ट आहे. या स्विचिंग स्टेशनचे कामचा खर्च 15.49 कोटी रुपये झालेला आहे. येणाऱ्या दोन महिन्यात एक नवीन उपकेंद्र ही सुरू होणार आहे. विद्युत यंत्रणा सुधारणा योजने अंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये 15 कोटी 49 लाख रुपये खर्चाच्या मंजूर आराखड्यातील किंग्फा 22/22 केव्ही स्विचिंग स्टेशन व ह्युंदाई 22/22 केव्ही स्विचिंग स्टेशन  कार्यान्वित करण्यात आले.

Vadgaon Maval : सर्व पोल्ट्री योद्ध्यांनी संघटित होणे ही काळाची गरज – अनिल खामकर

तसेच येणाऱ्या गुरुवारी (दि.21) या परिसरातील बरेच फिडर अपग्रेड केले जाणार आहेत. व त्यामुळे वीजे ये-जा करणे व वीजपुरवठा बंद होणे हे प्रकार कमी होऊन कोणत्याही व्यत्ययाव्यतीरीक्त  उद्योगांना मिळणार आहे. व त्यामुळे उद्योगांचे व त्याचबरोबर MSEDCL चे होत असलेले नुकसान यापुढे होणार नाही व उद्योगांच्या बऱ्याच तक्रारी संपणार आहेत.

थोड्याच कालावधीमध्ये ग्राहकांना प्रीपेड मीटर पुरविले जाणार आहेत त्यामुळे थकबाकीचा प्रश्न सुटणार आहे व वीज चोरी ही थांबणार आहे.MSEDCL चा खेड विभाग हा अत्यंत मोठा व विस्तृत आहे खेड पासून लोणावळ्यापर्यंत पसरलेला आहे. त्यामुळे एक एक्झिक्युटी इंजिनियर वर खूप मोठ्या प्रमाणावर कामाचा ताण येतो व याचा MSEDCL चे सेवावर परिणाम होतो .

म्हणून MSEDCL चे पुणे विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सांगितले की येणाऱ्या काळात या परिसराचे दोन विभाग करून उद्योगांसाठी वेगळा विभाग सुरू करण्यात येणार आहे व त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मनुष्यबळही उपलब्ध करून देले जाणार आहे. आणि उद्योगांना व ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा सेवा MSEDCL कडून होणार (Chakan ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.