Vadgaon Maval : सर्व पोल्ट्री योद्ध्यांनी संघटित होणे ही काळाची गरज – अनिल खामकर

एमपीसी न्यूज – आपल्या न्याय हक्कासाठी सर्व पोल्ट्री (Vadgaon Maval) योद्ध्यांनी संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष अनिल खामकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेची राज्यस्तरीय बैठक नगर येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
राज्याचे अध्यक्ष अनिल खामकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. सभेस संघटनेचे सचिव   विलास साळवी,खजिनदार प्रकाश लसणे, कार्याध्यक्ष सर्जेराव भोसले, शरद गोडांबे, राज्य संघटक सोनबा गोपाळे गुरूजी, बाबासाहेब देशमुख, उपाध्यक्ष नंदकुमार चौधरी, दिपक पाटील, सुभाष केदारी, तालुकाध्यक्ष  एकनाथ गाडे, सचिन आवटे, महेश कुडले, रविंद्र खराडे, रमेश जयदेव यांचेसह 32 जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आपल्या न्याय हक्कासाठी सर्व पोल्ट्री योद्ध्यांनी संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष अनिल खामकर यांनी केले. यावेळी  सर्व वक्त्यांनी संघटना बांधणी बाबत मार्गदर्शन केले. कार्याध्यक्ष सर्जेराव भोसले यांनी सभेचे आयोजन केले होते. सभेनंतर मराठवाडा आणि  विदर्भ येथील पोल्ट्री शेतकऱ्यांच्या सभा घेण्यासाठी पदाधिकारी रवाना (Vadgaon Maval) झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.