Pimpri : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पिंपरी कार्यालयाने पकडल्या बनावट देशी दारूच्या 60 हजार बाटल्या

एमपीसी न्यूज – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पिंपरी कार्यालयाने देहूरोड ( Pimpri ) जवळील मामुर्डी येथे मोठी कारवाई केली. मामुर्डी आणि गोवा येथे कारवाई करत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

झुल्फिकार ताज आली चौधरी (वय 68, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश), अमित ठाकूर आहेर (वय 30, रा. बोरमाळ पारसवाडा, ता. तलासरी, जि. पालघर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Pune : आता पुणेरी पाटीने होणार पुणेकरांची वाहतुकीबाबत जनजागृती, पुण्यात राबवणार तीन महिन्याचा पायलट प्रोजेक्ट

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावर मामुर्डी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पिंपरी कार्यालयाने 23 जानेवारी रोजी एक टेम्पो (डीडी 01/आर 9205) ताब्यात घेतला. त्यामध्ये बनावट देशी दारू रॉकेट संत्रा 90 मिली क्षमतेच्या 60 हजार बाटल्या आढळल्या. या बनावट मध्याची किंमत 21 लाख रुपये आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 21 लाखांचे मद्य 15 लाखांचे वाहन असा 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

त्यानंतर टेम्पो चालकाकडे चौकशी करत त्याने हा दारूसाठा गोवा राज्यातून आणला असल्याचे समोर आले. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने वडावल, ता. डीचोली, जि. उत्तर गोवा या ठिकाणी असलेल्या बनावट देशी मद्यनिर्मितीच्या कारखान्यावर छापा घालून कारवाई केली. त्यामध्ये देशी दारू तयार करण्यासाठी लागणारा एक लाख 34 हजार 895 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोघांना अटक करत त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पिंपरी कार्यालयाचे निरीक्षक दीपक सुपे तपास करीत ( Pimpri ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.