SSC Exam Hall Ticket : दहावीच्या परीक्षांचे हॉल तिकीट 31 जानेवारी पासून मिळणार

एमपीसी न्यूज – दहावीच्या परीक्षांचे प्रवेशपत्र (SSC Exam Hall Ticket) बुधवार (दि. 31 जानेवारी) पासून मिळणार आहेत. हे प्रवेशपत्र ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.

दहावीच्या परीक्षा मार्च 2024 मध्ये होणार आहेत. त्यासाठी शिक्षण मंडळाची तयारी सुरू आहे. शिक्षण  मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवारी school login मध्ये download करण्याकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

Pimpri : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पिंपरी कार्यालयाने पकडल्या बनावट देशी दारूच्या 60 हजार बाटल्या

शाळांनी दहावी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्याथ्यर्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र (Hall Ticket) उघडताना काही त्रुटी (Error) आल्यास सदर प्रवेशपत्र Google Chrome मध्ये उघडावे. प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा/प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, अशाही शिक्षण मंडळाच्या सूचना आहेत.

प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम यामध्ये बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारीख, जन्म स्थळ या संदर्भातील दुरुस्त्या शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायची आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले आहे.

प्रवेशपत्र विद्याथ्यर्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित शाळांकडून पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यास दिले ( SSC Exam Hall Ticket ) जाईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.