SSC : दहावीच्या परिक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त वाढवावी, योगेश वाणी यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळाच्या (SSC) दहावीच्या परीक्षा सुरु आहेत. या कालावधीत कोणातही गैरप्रकार होऊ नये यासाठी परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त वाढवावी, अशी मागणी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष योगेश वाणी यांनी केली आहे.

त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गैरकृत्यापासून रोखल्याच्या रागातून काळेवाडी येथील सेंट अल्फान्सो हायस्कूलच्या एका विद्यार्थ्याला रॉजर्स शाळेतील दहा बारा विद्यार्थ्यांच्या टोळक्याने बेदम मारहाण करण्याची घटना घडली. 8 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे नियोजित पेपर सुटल्यानंतर घडली. ही घटना शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या प्रकारात संबंधित विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. मात्र एफआयआर दाखल करून घेण्यात आला नाही. एका पोलीस उपनिरीक्षकाने विद्यार्थ्यांच्या वडिलांचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यावर पुढे काय कारवाई झाली ते समजू शकलेले नाही.

Pimpri Chinchwad : सेवा विकास बँक प्रकरणी लाच घेणाऱ्या ईडीच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळाच्या दहावीच्या परिक्षा आज संपत आहेत. त्यावेळी (SSC) विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारच्या मारमारीच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. तरी असे प्रकार टाळण्यासाठी दहावीच्या सर्व परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, ही विनंती वाणी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.