Pune News : अथक प्रयत्नांनी दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

एमपीसी न्यूज – नाणेघाट परिसरातून मागील आट दिवसांपासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा आठ दिवसांनी(Pune News)  मृतदेह दरी बाहेर काढण्याला बुधवारी (दि.18) यश आले आहे. ही मोहीम स्थानिक पोलीस व गावकऱ्यांच्या मदतीने टीम शिवदुर्ग यांनी पार पाडली.

मनेश गोरख जठार (वय 24 रा.लोणी व्यकंनाथ, श्रीगोंदा) अये मयत तरुणाचे नाव आहे. (Pune News) तर शिवदुर्गचे टिम योगेश उंबरे ,महेश मसने, सिध्दार्थ आढाव, समीर जोशी,रतन सिंग,सिध्देश निसाळ,अमोल सुतार,अनिल आंद्रे ,सागर कुंभार व सुनिल गायकवाड स्थानिक जुन्नर चे प्रशांत कबाडी, साईनाथ कबाडी संतोष कबाडी, यांनी केली.

Bhosari News : तलवारीसह सोशल मीडियावर फोटो टाकणारे बहाद्दर अटकेत

 

शिवदुर्गच्या टीम ने दिलेल्या माहितीनुसार, मनेश हा 11 जानेवारी पासून बेपत्ता होता. त्याची गाडी व शेवटचे लोकेशन नाणे घाट मध्ये 12 जानेवारीला मिळाले आहे. पोलिसांनी नाणेघाटातील सर्व ठिकाणी स्वतः व वेगवेगळ्या ट्रेकिंग ग्रुप मार्फत शोध घेतला आहे परंतु कुठल्याही प्रकारची ठोस माहिती मिळाली नाही.

त्यानंतर स्थानिक राजकिय नेत्यांनी शिवदुर्ग टिमला मदतीसाठी बोलावले. शिवदुर्ग यांनी गुरुवारी (दि.19) सकाळपासून शोधुमोहिम सुरु केली. आठ दिवस झाले तरी काहीच हाती न लागल्याने शिवदुर्ग टीम समोर मोठे आवाहन होते.

 

प्रकरणाची पुर्ण माहिती घेतल्यानंतर  गाडी कुठे सापडली, काही सिसी टिव्ही फुटेज पाहिले व संशयास्पद जागेची पाहणी करण्यासाठी विरुद्ध दिशेला  दुर्बिण घेऊन टिम पाठवली . दुसरा गट कुठे कुठे शोध घेतला व काय साहित्य सापडले यावरुन एक जागा निश्चित केली. सकाळी साडे नऊला कामाला सुरुवात करण्यात आली.

Talegaon News : पावणे सहाशे ग्रॅम गांजा सह टपरी चालकाला अटक  

नियोजनानुसार सुरवातीला योगेश उंबरे एक हजार फुट खाली दरीमध्ये रॅपलींग करुन गेले . नंतर सिध्दार्थ आढाव मदतीला गेले . संशयास्पद वाटणाऱ्या खाणा खुणा शोधल्या ,जे स्पष्ट पांढऱ्या रंगाचे दिसत होते  पण तो मृतदेह नव्हता.

पण पुढे एक काळी पॅन्ट व ओळखपत्र सापडले .व तपासाला दिशा मिळाली. जी पॅन्ट मिळाली ती या मुलाचीच होती खात्री झाली. मग वास यायला लागला पण बॉडी दिसत नव्हती थोडे अजून शोधाशोध केल्यावर त्याच लाईन मध्ये खाली शर्ट सापडला व नंतर बॉडी दिसु लागली साधारणपणे दुपारी बारा  (Pune News) वाजता. पण  रोप कमी असल्यामुळे तिथपर्यंत जाता येत नव्हते. शोध मोहिमा करताना लूज रॉक मूळे अपघात होतात.

Chinchwad News : येत्या सोमवारी रंगणार महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी महाप्रतियोगिता सोहळा 

आपल्या अजूबाजूने मोठ मोठे दगड गोडे जातात. अखेर मृतदेहाजवळ जाताच  आता पोलीस अधिकारी यांची परवानगी घेऊन बॉडी वर घ्यायचे ठरले. बॉडी खाली गावात घेऊन जाता येईल का की वर खेचून घेणे सोपे जाईल यावर स्थानिक लोकांशी चर्चा केली व अंतर मोठे असल्याने दोन टप्प्यांत वर ओढून घेण्याचे ठरले व सगळी जुळवाजुळव करुन अथक परिश्रमाने बॉडी ठिक चार वाजता वर आणली.

 

शिवदुर्ग यांनी ही मोहिम सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे चार अशी सात राबवत अखेर मृतदेह दरी बाहेर काढून तो मयतांच्या नातेवाईकांच्या हवाली केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.