Chinchwad News : येत्या सोमवारी रंगणार महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी महाप्रतियोगिता सोहळा 

एमपीसी न्यूज – कस्तुरी सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी 2022 ही प्रतियोगिता स्पर्धा चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात रंगणार असून यामध्ये केवळ विजेत्या स्पर्धकांना नाही तर उपस्थित प्रेक्षकांसाठीही बक्षिसांची लयलूट केली(Chinchwad News) जाणार आहे.

ही स्पर्धा महाराष्ट्राच्या विविध भागातून आयोजित करण्यात आली होती. व त्यातील विजेत्या स्पर्धकांना महा प्रतियोगिता सोहळयात 2022 ची महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी होण्याचा सन्मान मिळणार आहे. या प्रतियोगितेत कुमारी व सौभाग्यवतींचा सहभाग असणार आहे. या दोन्ही गटातून विविध शीर्षकाची सौंदर्य सम्राज्ञी सोबत महाराष्ट्रात प्रथमच महा विजेती सौंदर्यसम्राज्ञीची ही निवड होणार आहे. महाविजेतीला मुकुट सोबत रेनॉल्टची कार बक्षीस देण्यात येणार आहे.

Chinchwad Bye Election : पोटनिवडणुकीतील उमेदवाराबाबत जगताप परिवार व वरिष्ठ नेते निर्णय घेतील – उमा खापरे

या महोत्सवाचे कस्तुरी सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटक उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सुगत वाघमारे तसेच महोत्सव समारोप अध्यक्ष हे ॲडवोकेट राजेश झाल्टे असणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, मेघराज राजे भोसले, अभिनेता पंढरीनाथ कांबळे, अभिनेता अंकुश गेडाम, अभिनेत्री सायली पाटील (झुंड चित्रपट फेम), चित्रपट निर्माता प्रकाश बाविस्कर, सुप्रसिद्ध वर्दीतला गायक संघपाल तायडे, खानदेशचा सुप्रसिद्ध अभिनेता सचिन कुमावत, अभिनेत्री पुष्पा ठाकूर व विनोदी कलाकार प्रवीण माळी (Chinchwad News )उपस्थित राहणार आहेत. एमपीसी न्यूज हे या कार्यक्रमाचे मिडिया पार्टनर असणार आहेत.

हा कार्यक्रम तीन सत्रात होणार आहे. सकाळी अकरा वाजता सहभागी स्पर्धकांचा संस्कृती कार्यक्रम गुण कौशल्य फेरी.दुपारच्या सत्रात महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धकांचा रॅम्प वॉक आणि परिचय फेरी व मराठी बोलीभाषांना प्राधान्य देणारी धमाल विनोदी नाटिका प्रवीण माळी सादर करणार आहेत.

Alandi News : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास सुरवात

तिसऱ्या सत्रात अस्सल मराठमोळी वेशभूशेत मराठी तालावर सुंदर पदक्रमन म्हणजे रॅम्प वॉक आणि बौद्धिक कौशल्य फेरी व सोबत रंगणार मराठी अहिराणी गीत संगीत नृत्याचा बहारदार कार्यक्रम. महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीच्या प्रथम दहा उत्कृष्ट विजेत्यांना पैठणी साड्या भेट देणार आहेत.

प्रेक्षकांसाठी आकर्षण –

प्रेक्षकांनाही विविध बक्षिसे जिंकण्याची संधी महाराष्ट्र बाजार पेठ यांच्यातर्फे देण्यात येणार आहे . प्रेक्षकांमध्ये महिला समूहातून तीन पैठणी साड्यांचे व तीन सोन्याच्या नथीचे लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्यांसाठी काढण्यात येतील. व पुरुष समूहातून तीन सूट लेन्थ व तीन गणपती चांदीच्या फ्रेमसाठी भाग्यवान विजेते लकी ड्रॉ द्वारे काढण्यात येतील.

महाराष्ट्र बाजार पेठकडून सर्व प्रेक्षक समूहातून दहा हजाराचे 5 गिफ्ट व्हावचर्समधून (डायमंड ज्वेलरी पवित्रम) भाग्यवान विजेत्यांची निवड होईल. प्रेक्षकांसाठी सांस्कृतिक आणि बक्षीसांची मेजवानी सोबत रात्रीच्या जेवणाची ही मेजवानी कार्यक्रमात असेल. जेवणाची कुपन दुपारी तीन ते चार या (Chinchwad News) वेळेत उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना देण्यात येणार आहेत. टॉप टेन 10 विजेत्या महिलांना पैठणी भेट देण्यात येणार असून दक्षता बॅग्स महिला लघु उद्योगकडून प्रत्येक मराठी कलाकारांना बॅग् व विजेत्या टॉप टेन महिलांना बॅग दिल्या जाणार आहेत.

Dehuroad News: निसर्ग मित्रांचा रविवारी घोराडेश्वर डोंगरावर स्नेहमेळावा

कार्यक्रमाच्या ठिकाणी कस्तुरी मंच 2023 ची सदस्य नोंदणी होणार आहे. सदस्य फी फक्त 300 रुपये असणार आहे.या स्पर्धेत पिंपरी चिंचवड सौंदर्य सम्राज्ञी 2023 सौंदर्य स्पर्धेत निशुल्क सहभाग घेण्याची संधी मिळेल. आम्ही उद्योजिका महामेळाव्यात निशुल्क प्रवेश असणार आहे. सांस्कृतिक महोत्सवात निशुल्क सहभाग असणार आहे. चित्रपट, व्हिडिओ, अल्बम मॉडलिंग करण्याची संधी देखील मिळू शकते. विविध कार्यक्रमात तुमच्या गुणवत्तेनुसार संधी व महिला दिनाला कस्तुरी गौरव व राजमाता जिजाऊ पुरस्कार( Chinchwad News)दिला जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.