Dehuroad News: निसर्ग मित्रांचा रविवारी घोराडेश्वर डोंगरावर स्नेहमेळावा

एमपीसी न्यूज – निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे देहूरोड जवळील घोराडेश्वर डोंगरावर पंधरा वर्षापासून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम सुरु आहे. या वृक्षारोपणसाठी पिंपरी-चिंचवड मधील शेकडो निसर्ग मित्र व पर्यावरण प्रेमी संस्थांचा सहभाग असतो. अशा सर्व निसर्ग मित्रांचा, संस्थांचा स्नेहमेळावा, तिळगुळ व हळदी कुंकू समारंभ  येत्या (रविवारी) सकाळी 7 वाजता घोराडेश्वर डोंगरावर(Dehuroad News)आयोजित केला आहे.  

यानिमित्ताने डोंगरावर सुरु असलेल्या कामाची माहिती घेणे, वृक्षांची माहिती घेणे व आगामी काळात योगदान देणे यासाठी जास्तीत पर्यावरण प्रेमींनी सहकुटुंब उपस्थित रहावे असे विजय सातपुते यांनी मंडळाच्या वतीने केले आहे. निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ पिंपरी-चिंचवड शहरामध्ये चाळीस वर्ष विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहे. यामध्ये शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला, हजारो पुस्तकांचे ग्रंथालय व अभ्यासिका, सैन्यदलात जाण्यासाठी मार्गदर्शन वर्ग, स्वतंत्र व सक्षम असा महिला विभाग, संस्कृती संवर्धन व विकास महासंघ कार्यरत आहे.

Chinchwad Bye Election : उमेदवारीवरुन घमासान; भाजपमध्ये दोन गट

पर्यावरण संवर्धन या विषयाला वाहिलेला मंडळाचा *निसर्ग मित्र* विभाग पंधरा वर्षापूर्वी सुरू करण्यात आला. शाळा – महाविद्यालयात पर्यावरण जागृतीसाठी विविध स्पर्धा, किल्ले बनवा स्पर्धा, किल्ले व निसर्ग अभ्यास सहली, राज्यस्तरीय पर्यावरण वक्तृत्व स्पर्धा, नदी स्वच्छता मोहीम यासारखे अनेक उपक्रम विभागातर्फे आयोजित केले जातात.

सावरकर मंडळाचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे हरित घोराडेश्वर प्रकल्प. देहूरोड जवळील उघड्या बोडक्या अशा घोराडेश्वर डोंगरावर पंधरा वर्षापासून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम सुरु आहे. या अंतर्गत आतापर्यंत हजारो झाडे लावली असून तळाशी असलेल्या बोअरमधून पाणी घालून वाढवली आहेत. नैसर्गिक व मानवनिर्मित वणव्यांपासून रक्षण करुन जगवलेल्या या पैकी काही झाडे आता पंधरा विस फूट उंचीची झाली आहेत. त्यांना आता फुल, फळ लागायला सुरवात झाली आहे. ही फळ खायला छोटे मोठे प्राणी, नाना प्रकारचे( Dehuroad News)पक्षी येतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.