Dehuroad : चाकुचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुटले

एमपीसी न्यूज – लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यावसायिकाला चाकुचा धाक दाखवून चोरट्यांनी लुटले आहे. ही घटना बुधवारी (दि.18) देहुरोड येथील पुना गेट हॉटेल समोर रस्त्यावर घडली आहे.

याप्रकरणी धीरज मोती शाही (वय 32 रा. देहुरोड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात तीन चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri News : बोगस पटसंख्या दाखवून अनुदान लाटणा-या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करा – राहुल कोल्हटकर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले असताना आरोपी त्यांच्या दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादी यांना चाकुचा धाक दाखवून फिर्यादीचा दुचाकी (एम एच 14 जी क्यू 9934) व मोबाईल असा एकूण 42 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यावरून देहुरोड पोलीस पुढील तपास करत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.