Chinchwad :  ‘उबाठा’ला खिंडार, प्रमुख पदाधिकाऱ्यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मावळ तालुक्यात (Chinchwad)शिवसेना ‘उबाठा’ला मोठे खिंडार पडले असून तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

काळेवाडी येथे झालेल्या शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप (Chinchwad)मित्रपक्ष महायुतीच्या मेळाव्यात हा शिवसेना पक्षप्रवेश झाला. खासदार बारणे यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले.

‘उबाठा’ गटाचे मावळ उपतालुकाप्रमुख व माजी सरपंच चंद्रकांत भोते, ओव्हळे गावचे विद्यमान उपसरपंच समीर कराळे, उबाठा शाखाप्रमुख विजय भोते, माजी सरपंच मनोहर भोते, गणेश भोते, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भोते, नवनाथ भोते, उबाठा परंदवडी शाखाप्रमुख विकास जगदाळे, गणेश भोते, कचरेवाडी येथील संतोष कचरे, मधुकर कचरे, रामदास कचरे आदींसह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

Pune :अपघातांची श्रृंखला थांबवण्यासाठी कात्रज, कोंढवा परिसरात वाहतूकीत बदल

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, जिल्हा संघटक अंकुश देशमुख, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, तालुका संघटक सुनील मोरे, युवा सेना सचिव विश्वजित बारणे, युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, उपजिल्हाप्रमुख दत्ता केदारी, गिरीश सातकर, युवासेना तालुकाप्रमुख विशाल हुलावळे, उपतालुकाप्रमुख राम सावंत, देहू शहरप्रमुख सुनील हगवणे, लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, युवा सेना शहर अधिकारी विवेक भांगरे, वडगाव शहरप्रमुख प्रवीण ढोरे, सागर वारुळे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.