Alandi: माऊली मंदिरात परिचय भागवत धर्माचा… ओळख ज्ञानेश्वरीची या पुस्तिकेचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर परिचय भागवत(Alandi) धर्माचा…ओळख ज्ञानेश्वरीची या पुस्तिकेचे प्रकाशन समारंभ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात पार पडला. परिचय भागवत धर्माचा ओळख ज्ञानेश्वरी ची या पुस्तिकेची संकल्पना व संकलन अभय टिळक व संकलन सहाय्य उमेश बागडे यांची आहे.

या पुस्तिकेचे प्रकाशन समारंभा वेळी देवस्थान विश्वस्त योगी(Alandi) निरंजन नाथ, माझी विश्वस्त डॉ अभय टिळक, देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे,सुरेश वडगावकर, अजित वडगावकर, उमेश बागडे,विलास वाघमारे, विश्वंभर पाटील,पुरुषोत्तम महाराज हिंगणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

शालेय वयातील संस्कारक्षम मनांवर ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी सारख्या चिरंतन अक्षर ठेव्याद्वारे अमूल्य विचारधनाचे सिंचन व्हावे ,या हेतूने 2021 सलापासून सुरू असलेल्या ओळख ज्ञानेश्वरी या एका अभिनव व स्तुत्य उपक्रमाच्या अंतरंगाची रुपरेषा प्रस्तुत पुस्तिकेच्या रूपाने साकारण्यात आली.संतांच्या विचारांची ओळख बालवयापासून च होणे हे व्यक्तीच्या जडणघडणीच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे.

हे अचूकपणे ओळखून श्री क्षेत्र आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि श्री क्षेत्र आळंदी येथीलच श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था या उभय संस्थांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या त्या कल्पकतेला श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी तितकाच सकारात्मक व उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने या उपक्रमाची कार्यवाही आजवर अतिशय आंनदाने होत आली आहे. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर या उपक्रमाशी संलग्न असलेल्या घटकांच्या प्रस्तवास प्रतिसाद देत या उपक्रमाचे पालकत्व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थेने स्वीकारले.

इतर शाळांमध्ये देखील हा उपक्रम सुरू करावा अशी मागणी लोकमाणसांद्वारे होऊ लागली. त्यास उपक्रमाच्या प्रवर्तकांनी आनंदाने सकारात्मक प्रतिसाद दिला. तदनंतर इतर शाळेमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला.या उपक्रमास आळंदी शहर पत्रकार संघाचे सुद्धा सहकार्य लाभले आहे.

Pune :अपघातांची श्रृंखला थांबवण्यासाठी कात्रज, कोंढवा परिसरात वाहतूकीत बदल

हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रमाण करण्यात आलेला असल्याने मुलांचे वय त्यांची आकलन क्षमता आणि जाण यांचा तारतम्याने विचार करून दुसऱ्या अभ्यास घटकातील निवड येथे केली आहे .यात संताचे बोल, वारकरी संतांच्या परंपरेतील एकंदर 10 संतविभूतींचे अभंग आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी येथील शंभर पेक्षा अधिक ओव्या यांचा समावेश या पुस्तिकेमध्ये केलेला आहे. या साधन पुस्तिकेत एकंदर 25 अभ्यास घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या गटात 9 घटक तर दुसऱ्यात 16 घटक आहेत. प्रत्येक अभ्यास घटक दोन विभागात सादर केलेला आहे. पहिल्या विभागास पुष्प शीर्षक आहे. तर मंजिरी असे शीर्षक दुसऱ्या विभागास दिले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.