Alandi News : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास सुरवात

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे (Alandi News) दि.20 जानेवारी पासून डुडूळगाव येथून इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी जेसीबी मशीन द्वारे काढण्यास सुरवात झाली आहे.

Hinjawadi Crime : सापडलेल्या एटीएम चा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हा

मदतीस दोन बोट व कर्मचारी वर्ग ही आहेत. मोशी लगत चिंबळी बंधारा ते चऱ्होली पर्यंत इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यात येणार आहे. याबाबत माहिती तेथील कर्मचाऱ्यांने दिली.(Alandi News) नदीपात्रातील दाट जलपर्णी मुळे पाण्यातील जलचर जीवांना धोका निर्माण झाला होता.नदीपात्रातील ही जलपर्णी काढल्यामुळे जलचर प्राण्यांना पुरेसा प्राणवायू मिळणार असून जलचर जीव सृष्टी वाचण्यास मदत होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.