Hinjawadi Crime : सापडलेल्या एटीएम चा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – सापडलेल्या एटीएम कार्डचा गैरवापर करत परस्पर पैसे काढून घेणाऱ्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. (Hinjawadi Crime) हा प्रकार बुधवारी (दि.18) दुपारी हिंजवडी येथील समर्थ पेट्रोल पंपाजवळ घडला.

याप्रकरणी प्रेमकुमार गुलाब वाघमारे (वय 41 रा.म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली असून शैलेश रघुनाथ बोडके (वय 32 रा. रिहे, मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri News : कामगाराची नजर चुकवून चोरली पावणे चार तोळ्याची सोन्याची साखळी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे हरवलेले एटीएम वायफाय डेबीट कार्ड आरोपीला सापडले. त्याने कार्डचा गैरवापर करत फिर्यादी यांच्या कार्डद्वारे पैसे काढले.(Hinjawadi Crime) फिर्यादी यांनी त्यास थांबवले असता आरोपीने आरोरावीची भाषा करत तो त्याच्या एमएच 12 जे.एन 5802 या दुचाकीवरून पळून गेला. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.