Akurdi news : गुरव समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन

एमपीसी न्यूज-अखिल गुरव समाज संघटनेतर्फे दरवर्षी प्रमाणे राज्यस्तरीय वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला (Akurdi news)आहे. याचसोबत देवस्थान हक्क परिषद, नागरी सत्कार समारंभ, राज्यस्तरीय पदाधिकारी बैठक व तिळगुळ हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेने दिली आहे.

मेळाव्याचे उदघाटन प्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, सुनिल शेळके, भीमराव तापकीर, निलेश लंके, माधुरी मिसाळ व विधान परिषद आमदार उमाताई खापरे उपस्थित राहणार आहेत.

Pimpri News : कामगाराची नजर चुकवून चोरली पावणे चार तोळ्याची सोन्याची साखळी

 हा मेळावा22 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आकुर्डी येथील खंडोबा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. अखिल गुरव संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष अँड. अण्णासाहेब शिंदे व स्वागताध्यक्ष  नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे यांनी सर्व समाज बांधवाना व भगिनींना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे(Akurdi news) आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.