Chinchwad Bye Election: कोणत्याही परिस्थिती घड्याळावरच निवडणूक लढवावी

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही परिस्थितीत लढवावी. ही जागा लढताना ती फक्त आणि फक्त घड्याळ(Chinchwad Bye Election) या चिन्हावराच लढावी. उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असलेलाच असावा, असे तीन ठराव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आज (शुक्रवारी) पारित करण्यात आले. तसेच या निवडणुकीकडे महापालिकेची रंगीत तालीम म्हणून बघायला पाहिजे. आता कोणाची भीतीही नाही आणि सहानुभूतीही नाही, असे सांगत स्थानिक नेत्यांनी निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची बैठक झाली. जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आणि एक औद्योगिक केंद्र असलेल्या चिंचवड मतदासंघांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार करण्याची संधी सोडू नये असा ठराव पक्ष संघटनेने एकमताने पारित केला. शहराध्यक्ष गव्हाणे म्हणाले,  ही निवडणूक महापालिकेची रंगीत तालीम म्हणून बघायला पाहिजे. तसेच आपले पक्ष संघटन मजबूत असून बूथ स्तरीय तयारी झाली आहे. शहरात आरएसएसचे प्राबल्य वाढत असल्याने या गोष्टींना अटकाव घालण्याचे काम आपल्याला करायचे आहे.

Akurdi news : गुरव समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, एक महिना आपल्याला घरी जायचे नाही. विजयश्री खेचून आणायची आहे. आता कोणाची भीतीही नाही आणि सहानुभूतीही नाही. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी ही पोटनिवडणूक अतिशय महत्त्वाची आहे.  चिंचवडमध्ये पक्षाचे अस्तित्व टिकविण्याच्या दृष्टीने ही निवडणूक लढणे गरजेचे आहे.

तर माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी मागच्या 10 वर्षात राष्ट्रवादीचा आणि अजितदादांनी केलेल्या कामाचा फायदा घेऊन पक्षाचे नुकसान करताना कोणी विचार केला नाही. (Chinchwad Bye Election)आता पक्षाने देखील कुणाचा विचार करायची गरज नाही, असे स्पष्ट मत मांडले. शहरातील ज्येष्ठ नेत्यांनी देखील ही निवडणूक लढविण्यात यावी अशी भावना बोलून दाखवली. कार्यकर्त्यांनी उस्फूर्त भावना व्यक्त करत ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याची मागणी केली आहे. तसेच प्रयत्नांची पराकाष्ठा करत ही निवडणूक आपण जिंकू असा संकल्प केला आहे.

Pune News : वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार असणे हे येत्या महापालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असणार आहे. तसेच याठिकाणी निवडणूक झाल्यास कुठल्याही इतर पक्षांना ही जागा सोडण्यात येऊ नये. याठिकाणी घड्याळ याच चिन्हावर निवडणूक लढविण्यात यावी, असेही या प्रस्तावात म्हटले आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठी आणि प्रांताध्यक्ष यांच्या पर्यंत घेऊन जाणार असल्याचे यावेळी सांगितले.

निष्ठेचा आणि नियोजनपूर्वक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची ही संधी आपण सोडता कामा नये. जेणेकरून पक्षसंघटनेचा योग्य संदेश तळागाळापर्यंत जाईल. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत आपल्याला निश्चितपणे फायदा होईल. म्हणून वरील प्रस्तावावर गांभीर्यपूर्वक विचार करून योग्य निर्णय घेण्यात यावा. शेवटी आपण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घ्याल तो आम्हाला शिरसावंद्य आहेच, असेही म्हटले आहे.

या बैठकीस माजी महापौर संजोग वाघेरे, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, माजी नगरसेवक शाम लांडे, मयुर कलाटे, विनोद नढे, पंकज भालेकर, अरूण बोऱ्हाडे,  गोरक्ष लोखंडे, राजु लोखंडे, विनायक रनसुभे, फझल शेख, नारायण बहिरवडे, माजी नगरसेविका माया बारणे, संगिता ताम्हाणे, राष्ट्रवादी युवती अध्यक्ष वर्षा जगताप , चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, विविध सेलचे शहर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने(Chinchwad Bye Election) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.