NCP : शरद पवार आमचे दैवत! पण, शहर विकासासाठी अजितदादांसोबत!

शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकारिणीचा अजित पवार यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज – शरद पवार आमचे दैवत (NCP) आहेत. पण, पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मेळाव्याला मुंबईत हजेरी लावली.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. यापार्श्वभूमीवर शहरातील पदाधिकाऱ्यांचा शरद पवार की अजित पवार यांच्याबरोबर जायचे, यासंदर्भात तीन दिवसांपासून संभ्रम होता.

NCP Crisis : अजित पवारच राष्ट्रीय अध्यक्ष! 31 बंडखोरांमध्ये शरद पवारांचे जवळचे आमदार; जाणून घ्या सविस्तर

मंगळवारी बैठकांचे सत्र झाल्यानंतर बुधवारी मुंबई येथे झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मेळाव्याला शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राहुल भोसले, श्‍याम लांडे, प्रभाकर वाघेरे, संजय वाबळे, समीर मासूळकर, युवकचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, यांनी हजेरी लावली.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, अजितदादांनी 1991 पासून पिंपरी-चिंचवडचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास झाला. यापुढील काळातही आणखी (NCP) चांगला विकास होण्यासाठी शहराला दादांच्या नेतृत्वाची गरज आहे. पवारसाहेब आमचे दैवत आहेत. परंतु, आम्ही शहरातील सर्व नेते, पदाधिकारी माजी नगरसेवक, दादांसोबत आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.