Pune News : ‘महाराष्ट्र केसरी’सह विजेत्या मल्लांना बक्षिसांचे वितरण

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या 65 व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण आज झाले. (Pune News) महाराष्ट्र केसरी मुख्य किताब विजेता, उपमहाराष्ट्र केसरी, 18 वजनी गटातील विजेते, सांघिक विजेते, उपविजेते यांना घोषित केलेल्या थार, टॅक्ट्ररसह जावा गाड्या व अन्य बक्षिसांचे वितरण झाले.

Bhosari News : तलवारीसह सोशल मीडियावर फोटो टाकणारे बहाद्दर अटकेत

कोथरुड येथील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये झालेल्या या समारंभात यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ ठरलेला शिवराज राक्षे याला महिंद्रा थार गाडी व रोख पाच लाखाचे बक्षीस, (Pune News) उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखाचे बक्षीस प्रायोजक व संयोजक मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते देण्यात आले. प्रत्येक वजनी गटातील विजेत्यांना एचडी जावा गाडी व रोख बक्षीस देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.