Pune News : छत्रपती संभाजी महाराज तर स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर आणि धर्मवीर -संभाजी राजे

एमपीसी न्यूज -मागील महिन्याभरापासून छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक यावरून सध्या वाद सुरू आहे.त्याबाबत स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे यांना विचारले असता ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर आणि धर्मवीर (Pune News)आहेत.

आज पुण्यात स्वराज्य संघटनेच्याविषयी संभाजी राजे यांनी कायदेतज्ञ असीम सरोदे यांची भेट घेऊन चर्चा केली .

आपण या वादाच्यापलीकडे जाण्याची गरज आहे.या काही जुन्या पदव्या नाहीत .छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या ओरिजिनल उपाध्या वेगळ्या आहेत.100 ते 200 वर्षात आमच्यासारख्या लोकांकडून दिलेल्या उपाध्या आहेत.

Pune News : ‘महाराष्ट्र केसरी’सह विजेत्या मल्लांना बक्षिसांचे वितरण

तर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर आणि धर्मवीर असल्याचे आजवर मी केलेल्या ऐतिहासिक भाषणात सांगत आलो आहे. त्यावेळी कोणाला लक्षात आले नाही.पण आता(Pune News) धर्मवीर शब्दावरून वेगवेगळे राजकीय पक्ष राजकारण करीत आहेत.अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

भविष्यात स्वराज्य संघटना राजकीय पक्ष म्हणून देखील पुढे येऊ शकते असे संकेतही  संभाजी राजे यांनी यावेळी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.