Pimpri News : सोसायटीधारकांचे पाणी कनेकशन तोडण्याचे परिपत्रक 48 तासात मागे घ्या

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सदनिकाधारकांचा थकीत मिळकत कर वसुलीसाठी सोसायट्यांचे पाणी कनेक्शन तोडण्याचे काढलेले परिपत्रक 48 तासात (Pimpri News) मागे घ्यावे अशी कायदेशीर नोटीस पिंपरी-चिंचवड को ओ. हाउसिंग सोसायटी फेडरेशन आणि चिखली मोशी हाउसिंग फेडरेशन यांच्यावतीने बजावण्यात आली आहे. तसेच ते परिपत्रक मागे न घेतल्यास महानगरपालिकेच्या विरोधात गरज पडल्यास उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

ही नोटीस ऍडव्होकेट सत्या मुळे, मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी फेडरेशनच्या वतीने मनपाला दिली आहे. मुळे म्हणाले की, “ही नोटीस ई-मेल व आर पी डी ने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला दिली आहे.”

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने थकीत मिळकत कर वसुलीसाठी मोहीम सुरु केली आहे. त्या अंतर्गत त्यांनी हाउसिंग सोसायट्यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये जर कोणत्याही सदनिकाधारकांचे मिळकत कर थकीत असेल तर, किंवा  हाउसिंग फ्लॅटधारकांनी घरपट्टी भरली नसल्यास सोसायटीचे पाणी कनेकशन तोडले जाईल असे म्हंटले आहे. याला दोन्ही फेडेरेशन यांनी तीव्र विरोधात केला आहे.

Pune News : ‘महाराष्ट्र केसरी’सह विजेत्या मल्लांना बक्षिसांचे वितरण

चिखली येथील एका हाउसिंग सोसायटीचे पाणी कनेक्शन 10 ते 15 दिवसांपूर्वी तोडल्यावर चिखली मोशी हाउसिंग फेडरेशन यांनी त्यांचा विरोधात तक्रार केली होती. याबाबत भोसरीचे आमदार महेश लांडगे व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याशी बोलल्यानंतर पाणी कनेक्शन परत जोडण्यात आले होते.

पण त्यानंतर देखील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने हाउसिंग सोसायट्यांना नोटीसा बजावणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे शहरातील विविध हाउसिंग सोसायट्याचे पदाधिकारी तसेच दोन्ही फेडेरेशनच्या सदस्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

त्यामुळेच पिंपरी-चिंचवड हाउसिंग फेडेरेशन आणि चिखली मोशी हाउसिंग फेडरेशन यांनी त्यांच्या वकीलामार्फत महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे.

नोटिसमध्ये म्हटले आहे की, मनपाचे परिपत्रक हे बेकायदेशीर असून सामान्य नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे.

भारत हा लोक तांत्रिक देश असून येथे लोकशाही आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून येथील स्थानिक नागरिकांच्या कल्याणासाठी तयार केलेली आहे. ती अशा परिपत्रकाने लोकांना त्रास देण्यासाठी निर्माण केली गेली नाही. जे मिळकत कर भरतात अशा नागरिकांना देखील मनपा पिण्यासाठी व घरगुती वापरण्यासाठी पाणी पुरवत नाही.

पिंपरी-चिंचवड को.ओ हाउसिंग सोसायटी फेडेरेशनचे चेअरमन दत्तात्रय देशमुख म्हणाले की मनपाने ज्या सदनिकाधारकांनी कर भरलेला नाही अशावंर कारवाई करावी. एका किंवा काही थकबाकी दारांसाठी पुर्ण सोसायटीचे पाणी कनेक्शन तोडू नये. मनपाचा कारभार म्हणजे चोर सोडून सन्यशाला फाशी देण्यासारखे आहे.

याबाबत निलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, करसंकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचाशी संपर्क होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.