Pune : एस क्रिकेट लीग स्पर्धेत निर्माण क्वीन्स आणि अमन किया रायडर्सची बाजी.

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील व्यापाऱ्यांना एकत्र घेऊन (Pune)स्थापन करण्यात आलेल्या द एस क्लब च्या  वतीने  पुना क्लब च्या मैदानावर नुकतीच चार दिवसीय क्रिकेट लीग चे आयोजन करण्यात आले होते.

84 पुरुष आणि 39 महिला असे 9 संघ या चार दिवसीय(Pune) क्रिकेट लीग मधे सहभागी झाले होते.  अमन किया रायडर्स, मीरा ह्युंदाई युनायटेड, लिनीआ वॉरियर्स, सत्यम रायझर्स,  एलिट स्ट्रायकर्स, महाफास्ट चॅम्प्स, के – लाइन लेडी फाल्कन्स आणि एटी ॲव्हेंजर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला होता.

Nigdi : गुप्तदान करण्याचा बहाणा करत महिला व्यावसायिकाचे दागिने केले लंपास

महिला गटात अंतिम सामना निर्माण क्वीन्स (कर्णधार सेतू विवेक अग्रवाल) आणि एटी ॲव्हेंजर्स (कर्णधार सोनल संदिप जैन) यांच्यात झाला. तर पुरूष गटात अंतिम सामना मीरा ह्युंदाई युनायटेड (कर्णधार अमूल अग्रवाल) आणि अमन किया रायडर्स (कर्णधार आनंद मित्तल) यांच्यात झाला. एटी ॲव्हेंजरने 116 धावा केल्या तर निर्माण क्वीन्सने 117धावा करून विजय मिळवला.

 


मीरा ह्युंदाईने 3 गडी राखत 166 धावा केल्या तर अमन कियाने 3 गडी राखून 271 धावा करत विजय मिळवला. पुरुष संघातील वरिष्ठ गटातील आनंद मित्तल आणि कनिष्ठ गटातील रितेश अग्रवाल यांना मॅन ऑफ द टूर्नामेंट तर महिला संघातील वरिष्ठ गटातील सरोज अग्रवाल आणि कनिष्ठ गटातील जिया अग्रवाल यांना वूमन ऑफ द टूर्नामेंट चा पुरस्कार देण्यात आला.

विजयी संघास चषक तर प्रत्येक सहभागी खेळाडूस विजयचिन्ह देण्यात आले. या वेळी एस क्लब चे संस्थापक नरेश मित्तल, अध्यक्ष दिलीप गुप्ता, लीग चे चेअरमन अमित गुप्ता उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.