Pune : संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज –  प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन आणि जी ए रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन (Pune) यांच्या संयुक्त विद्यमाने रात्रीच्या कानडा रागांवर आधारित ‘संगीत संध्या’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवार दि. 30 जून रोजी सायं 5.30 वाजता मयूर कॉलनी येथील बालशिक्षण सभागृह येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

PCMC : गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

संगीत संध्या या कार्यक्रमात गायन, वादन, नृत्य चित्र यांद्वारे कानडा राग उलगडला जाईल. यावेळी आषाढी एकादशीचे औचित्य साधत कानडा रागात भजने सादर होतील. याबरोबरच बंदिशी, त्रिवट, तराणे, सरगम, चित्रपट गीते, गझल यांचे सादरीकरण देखील होईल, अशी माहिती कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची आहे त्या विदुषी सानिया पाटणकर यांनी दिली.

पाटणकर या स्वत: यावेळी गायन प्रस्तुत करतील. याबरोबरच कथक नृत्यांगना माधुरी आपटे आणि कलकत्त्याचे सुप्रसिद्ध सतार वादक पं सप्तर्षी हाजरा हे वादन करतील. प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनचे वृंदगायन ही आहे. यांबरोबर वसुधा कुलकर्णी (चित्र), आशय कुलकर्णी (तबला), अमेय बिच्चू (संवादिनी), अमन वारखेडकर (कीबोर्ड), अनुराग जोशी (बासरी) हे साथसंगत करतीय. स्वाती प्रभू मिराशी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार (Pune) आहे.

कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य  असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर यासाठी प्रवेश देण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.